2 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ती कंपनी भाजपाशीसंबंधित नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाकडून क्लिन चीट

No Foul Play, Awarding Contract, BJP Office Bearers Firm, Election Commission, Devang Dave

मुंबई, २६ जुलै : या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या आपल्या अंतरिम अहवालात त्या प्रक्रियेला क्लिन चीट दिली आहे. इंडिया टूडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी हा अहवाल मुख्य निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अहवालात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आणि देवांग दवे यांच्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याला नकार दिला आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय आणि डीजीआयपीआर (डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन, महाराष्ट्र) यांच्याकडून सोशल सेंट्रल मीडिया या कंपनीला कोणत्याही प्रकारचं कंत्राट दिलं नसल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सीईओ कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेसर्स साईनपोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची कामासाठी डीजीआयपीआरनं नियुक्ती केली होती. ही संस्था सरकारी विभागांच्या सर्व जाहिरांतींसाठी संस्थांची निवड करते. जाहिरातींसाठी संपूर्ण नियमांच्या अधिन राहून निविदा काढल्या जातात. स्वीप कॅम्पेनची निविदा कोणाला देण्यात यावी यासाठी सीईओ कार्यालयानं डीजीआयपीआरशी संपर्क केला होता. या कॅम्पेनमध्ये सोशल मीडियावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जाहिराती देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा होता. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला होता. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतली होती आणि याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून आरोपांप्रकऱणी सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली होती.

माजी पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला होता. गुरुवारी संध्याकाळी पोस्ट केलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये गोखले यांनी नमूद केलं की, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या काही जाहिराती पाहताना लक्षात आलं की त्या पत्त्यात मुंबईतील विलेपार्ले येथील कार्यालयाचा पत्ता आहे.

ते म्हणाले होते, “पत्ता २०२ प्रेस मॅन हाऊस, विलेपार्ले, मुंबई होता. तो कोणाचा पत्ता आहे हे शोधण्याचं मी ठरवलं. तर ती कंपनी निघाली साइनपोस्ट इंडिया, जी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या अखत्यारीत चालवली जाणारी संस्था होती.”

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये पुढे म्हटलं होतं की, “पण थांबा – ही अर्धी गोष्ट नाही आहे. २०२ प्रेस मॅन हाऊस पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला होता. ही एजन्सी देवांग दवे यांच्याकडे आहे, जे भाजप युवा संघटना, बीजेवायएमचे आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.”

 

News English Summary: He said a letter had been sent to the Central Election Commission (CEC) demanding a thorough inquiry into the matter. Meanwhile, the Chief Electoral Officer of Maharashtra has given a clean chit to the process in his interim report sent to the Chief Election Commission.

News English Title: No Foul Play In Awarding Contract To BJP Office Bearers Firm Ceo Maharashtra Tells Ec Devand Dave Congress News latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x