20 June 2021 4:22 PM
अँप डाउनलोड

फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घरी येऊन गेले - रक्षा खडसे

MP Raksha Khadse

जळगाव, ०२ जून | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेले अनेक दिली दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवस ते दौरे करत आहेत. अशात त्यांनी थेट जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने लोकांच्या भुवय्या उंचावल्या. भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी फडणवीस गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खडसेंनी भाजप सोडतानाही फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान यासंबंधी खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी प्रसार माध्यमांशी माझाशी बोलताना भाष्य केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीसंबंधी बोलताना रक्षा खडसे यांनी सांगितलं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी आहे आणि दुसरीकडे आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: Devendra Fadnavis paid a goodwill visit to Eknath Khadse’s house at Kothali. On this occasion, he met Raksha Khadse and other BJP office bearers. Speaking about the visit, Raksha Khadse said, “This is not the first time Fadnavis has come home. He has visited our house many times before.

News English Title: BJP MP Raksha Khadse clarification over Devendra Fadnavis visit at Muktainagar news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(613)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x