1 May 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे

मुंबई: इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.

‘मुंबईलगतच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा थांबवले आहे. परंतु हे सध्या वारंवार घडताना दिसत आहे. शिवस्मारक उभारणीबाबत सरकार खरंच गंभीर आहे काय? हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो आहे. गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतिक उंचीचा भव्य पुतळा उभा राहिला. परंतु तेथे ना पर्यावरणाची समस्या निर्माण झाली ना कोणता तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. केंद्र सरकारने सवर्णांना १० टक्के आरक्षण खास घटना दुरुस्ती करून बहाल केले. तर दुसरीकडे मुस्लिम महिलांसाठी बहुचर्चित तिहेरी तलाकचा विषय सुद्धा घटनेत बदल करून संपवला, पण अयोध्येत राममंदिर होत नाही व मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होत नाही. तेथे कोर्ट आडवे येते की कोर्टाची ढाल पुढे करून कोणी ही स्मारके होऊ देत नाही?’, असा थेट सवाल शिवसेनेने सामनामधून याविषयावर उपस्थित केला आहे.

‘काही दिवसांपूर्वी शिवस्मारकाचे भूमिपूजन अतिशय गुप्त पद्धतीने करण्याचा घाट घातला गेला होता. परंतु, त्यासाठी समुद्रात निघालेली बोटच खडकावर आपटून फुटली आणि बुडाली. दरम्यान, त्यात एका निरपराध तरुणाचा नाहक बळी सुद्धा गेला. शिवस्मारकाच्या उभारणीत केवळ विघ्ने येत आहेत आणि राज्य सरकार त्यावर केवळ मूग गिळून बसले आहे. ३६०० कोटी रुपयांचा हा अति भव्य प्रकल्प आहे, पण पहिल्या दिवसापासून सरकार या कार्याबाबत जराही गंभीर असल्याचे दिसत नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x