11 August 2020 8:39 PM
अँप डाउनलोड

BSF मधील जेवणाच्या दर्जावर तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

रेवाडी: सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याबद्दल थेट समाज ,माध्यमांवर मांडणारा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले BSF जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सदर प्रकरण आत्महत्येचं असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात येते आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सार्वजनिकरित्या तक्रार केल्यानंतर बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेज बहादूर यादव यांचा २२ वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह काल रेवाडीतील शांती विहार कॉलनीमधील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. दरम्यान, दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा रोहित त्याच्या आईवडिलांच्या घरी आला होता. त्यात रोहितचे वडील तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. रोहितची आई गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतली. त्यावेळी रोहितची खोली बंद असल्याचे समजले. त्याच्या आईने अनेकदा प्रयत्न करुन सुद्धा रोहितने दरवाजा न उघडल्यानं त्यांनी या घटनेची माहिती थेट पोलिसांना दिली आणि हा अचानक घडलेला प्रकार समोर आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianArmy(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x