12 December 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

महागाई-पेट्रोल-डिझेल वाढलं तरी पुन्हा 'अब की बार'? किती वेळेस अब की बार? बस झालं, आता एकदा आपटी बार, आपटा यांना एकदाचे!

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Rally at Pachor | उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत तुफान जनसागर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपाला लक्ष करताना जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.

शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावरती’ अशी कविता सादर करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या करत आहे. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, सरकारला त्याविषयी काहीही वाटत नसल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी 40 गद्दार गेल्याने फरक पडत नाही तर एक निष्ठावंत गेल्याने पडतो असंही ठाकरे यांनी म्हटले. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपावर जोरदार हल्लाबोल
भाजपा माझ्यासमोर आव्हान बिलकुल नाही पण जोपर्यंत भाजपा देशात आणि राज्यात सत्तेवर आहे, ते सत्तेवर असेपर्यंत माझ्या देशाच आणि राज्याच जे नुकसान करेल ते पुन्हा कस भरुन काढायचं हे माझ्यासमोर आव्हान आहे. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, जळगावमध्ये दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. एक 62 वर्षाचे आणि दुसरा 26 वर्षाचा मुलगा, राहुल राजेंद्र पाटील. त्याने नैराश्यातुन आत्महत्या केली. पीक गेलं, वडिलांकडुन 5 एकर जमीन घेतली होती. समोर आता कर्जाचा डोंगर.

नरेंद्र मोदींना महागाई आणि पुलवामा आरोपावरून केलं लक्ष :
नरेंद्र मोदीजी लोकसभेसाठी भाषणात म्हणतं, महंगाई बढी के कम हुई? पेट्रोल के दाम बढ गये या कम हुए? तुम्हीं सांगा हे वर गेलं की खाली गेलं? या सगळ्या थापा आपण ऐकतो, परत येतील. निवडणुका आल्या, पुन्हा ‘अब की बार’, किती वेळेस अब की बार? बस झालं, आता एकदा आपटी बार. आपटा यांना त्याशिवाय हे शहाणे होणार नाहीत. सत्यपाल मलिक यांनी मोलाची माहिती सांगितली, पुलवामा हत्याकांडात आपले चाळीस जवान शहीद झाले, ती पूर्ण चूक आपल्या केंद्रीय गृह मंत्रालयाची होती, त्यांनी त्या जवानांना पुरेशी सुरक्षा दिली नाहीच पण विमाने द्यायला हवी होती ती विमाने दिली नाहीत, म्हणून त्यांचे जीव गेले. सत्यपाल मलिक काश्मीरमधुन 370 कलम हटविण्याबद्दलही बोलले आहेत, कोण उत्तर देतंय? उत्तर देणे दूरच, त्यांच्या मागे सीबीआय लावली.

काल तर कहरच झाला, दोन-तीन दिवसांपूर्वी देखील जवान मारले गेले. तरी देखील आपले सर्व मंत्री जणु काही देशासमोरी सर्व प्रश्न संपलेले आहेत, आम्हांला कर्नाटकची निवडणूक महत्त्वाची आहे म्हणून कर्नाटकात ठाण मांडुन बसले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uddhav Thackeray attacked PN Narendra Modi at Pachora Jalgaon over Inflation check details on 23 April 2023.

हॅशटॅग्स

Uddhav Thackeray(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x