मुंबई : नगर मधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ एप्रिलला अहमदनगर दौऱ्यावर जाऊन हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. आज मुंबईत मातोश्रीवर नगर मधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी अहमदनगरचे सेना नेते अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर आणि लोखंडे उपस्थित होते.
स्थानिक शिवसैनिकांनी मातोश्रीवर दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर लगेचच स्थानिक शिवसैनिकांची धर पकड करण्याचे थेट आदेश एसपींना देण्यात आल्याचे ध्यानात आणून दिले आहे. त्या पाश्वभूमीवर मंगळवारी एकनाथ शिंदे, रामदास कदम विशाखा राऊत हे नगरमधील काडेगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
काडेगावच्या शिवसैनिकांचे तसे अटक सत्र चालू झाल्यास मंगळवारी नगरचे हजारो शिवसैनिक मंबईत दाखल होतील आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करा असा थेट आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.
