मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० गरजू मराठी महिलांना ऑटो रिक्षाचे मोफत वाटप करण्यात करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांच्या पुढाकाराने मुलुंड पश्चिमेकडील गरजू मराठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनसेचं महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले असून महिलांनी सुद्धा त्यासाठी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणाचं एक चांगलं उदाहरण शहरवासीयांपुढे ठेवले आहे. मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत या १०० ऑटो रिक्षांचे वितरण तेथील गरजू महिलांना करण्यात आले.
महिलांना रिक्षा वाटप झाल्यानंतर मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.
