28 May 2022 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल 1 June Rules | 1 जूनपूर्वी तुमची आवडती कार, बाईक किंवा स्कूटर खरेदी करा | नंतर खर्च किती वाढणार पहा
x

बलात्काऱ्यांना फाशी, मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार: आनंद महिंद्रा

मुंबई : उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना सर्वच थरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेचे आता कोर्पोरेट जगतातून सुद्धा पडसाद उमटू लागले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावना ट्विटर वरून व्यक्त केल्या आहेत. ट्विटरवर राग व्यक्त करताना आनंद महिंद्रा म्हणाले म्हणाले की, त्या बलात्कार्यांना फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार आहे.

पुढे ते म्हणाले की, बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. “जल्लादची नोकरी कोणालाही हवी हवीशी वाटत नाही. मात्र जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल, तर मी ही नोकरी आनंदाने स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमळे माझं रक्त खवळतं.

एकूणच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्कार्यांच्या विरोधात देशवासीयांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत आणि सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x