मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही असा सज्जड इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप – शिवसेना सरकारला दिला आहे. कालच नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये म्हणून स्थनिक नाणारवासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि प्रखर विरोध दर्शविला होता.

मनसेच्या वतीने मुलुंड पश्चिमेकडील गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक १०० महिलांना रोजगाराच साधन म्हणून ऑटो रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीच उपस्थितांना सभेद्वारे संबोधोत करताना राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलेला शब्द खरा ठरवत प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे आणि नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही असा थेट इशाराच राज्यकर्त्यांना दिला आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पा संबंधित विरोध बघून वक्तव्य केलं केलं होतं की, जर हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल. त्याच विषयाला हात घालत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना गुजरात शिवाय देशातील राज्य दिसतच नाहीत काय. तरी सुद्धा स्थानिकांचा त्या प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याने तुम्ही तो चंद्रावर नाहीतर आणखी कुठे घेऊन जा, परंतु कोकणात नाणार होणार नाही म्हणजे नाही असा सज्जड दमच राज्य सरकारला भरला.

Nanar Project is not required for Konkan