29 March 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती

BJP maharashtra, shivsena, mns, uddhav thackeray, devendra fadnavis, bmc, bridge accident, csmt, cst

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही असं सुजाता सानप यांनी सांगितलं होतं.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचं सांगितल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल महापालिकेच्या अख्त्यारित येत असून आम्ही सहकार्य करत असल्याचं सांगितलं होतं. पण महापालिका अधिकाऱ्यांना रात्री उशिरा या पुलाची जबाबदारी महापालिकेची होती स्पष्ट केल्याने संभ्रम दूर झाला आहे.

२५ वर्ष सत्तेत असलेली शिवसेना सामान्य मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे काय? असा सवाल सामान्य मुंबईकर करत आहेत. कोणतीही घटना घडली कि त्याची जबाबदारी झटकायची आणि गोंधळ निर्माण करायचा. जर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारात हा पूल येत होता तर याची योग्य ती देखभाल का नाही केली गेली? सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना – भाजप अशा घटनांवर तू तू मै मै करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि सत्तेत मात्र सोबत मलाई चाखतात असा काहीसा विरोधाचा सूर आज सामान्य मुंबईकरांनी लावलेला आढळला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x