13 May 2021 3:05 AM
अँप डाउनलोड

रेल्वे आणि मुंबई महापालिके विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

Shivsena, uddhav thackeray, mns, bjp maharashtra, mumbai, bridge collapse, csmt, cst

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी आणि जर स्ट्रक्चरल ऑडिट करणारी टीम आणि दुरुस्ती कामांमध्ये काही गैरप्रकार आढळला तर सदर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

परंतु लोक प्रश्नांना बाजूला सारून सतत फक्त राजकीय फायद्याचा विचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर गुन्हा कधी दाखल होणार याचीच वाट सामान्य मुंबईकर बघत आहे. २५ वर्ष सत्तेत असलेली शिवसेना हि काय करत आहे? मुंबईकरांचे सर्वसामान्य प्रश्न देखील यांना सोडवता येत नाहीत का? असा खडा सवाल मुंबईकर करत आहेत.

अर्थात पुतळे बांधण्यासाठी शिवसेना प्रणित महापालिकडे पैसे आहेत आणि फक्त राजकीय फायद्यासाठी पुतळ्यांच्या निर्माणाकरीता राखीव पैशाची तरतूद करणारा सत्तेत असलेला भज पक्ष ह्यांना जिवंत असलेल्या मुंबईकरांची किती चिंता आहे ते समजते. “करून दाखवले” म्हणणाऱ्यांनी आता “पाडून दाखवले” असा काहीसा सूर सामान्य मुंबईकर लावताना दिसतोय.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x