मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडून असलेला पादचारी पूल गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास कोसळला आणि या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा हिमालया पादचारी पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

थोड्याच अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नल च्या लाल दिव्याने बरेच प्राण वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेच्या अवघ्या काही मिनिटातच महापालिकेची डिसास्टर मॅनेजमेंट टीम आणि अग्निशमन दल दाखल झाले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये हा पूल धोकादायक नसून आणि किरकोळ दुरुस्ती ची गरज असल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु या घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करणारी टीम नक्की काय करते यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका आणि रेल्वे दोघांनी आपले हात झटकत याची जिम्मेदारी एकमेकांवर ढकलण्याचे काम केले आहे. अर्थातच मुंबईकरांचा जीव खूप स्वस्त आहे आणि आपण काही केलं तरी सामान्य मुंबईकराला आपण सहज मूर्ख बनवू शकतो या भ्रमातच नेहमी महापालिकेत असलेली शिवसेना दिसते.

CSMT passenger bridge collapsed, 6 died and 31 injured – mumbaikar’s life became so cheap