3 May 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

BREAKING | परमबीर सिंह यांच्याविरोधात मुक्त चौकशीचे ACB'ला राज्य सरकारकडून आदेश

Parambir Singh

मुंबई, १५ जुलै | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.

त्यावरुन राज्य सरकारने संबंधित प्रकरणातील भ्रष्ट्राचाराचा तपास करण्यासाठी मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्या या मागणीसंदर्भांत अतिरिक्त मुख्य सचिव सिंग (गृह विभाग) यांना पत्र लिहले होते. त्यानंतर काही दिवसांनी गृह विभागाने डांगे यांना पुन्हा कामावर रुजू केले.

माजी गृहमंत्र्यांवर लावले होते वसूलीचे आरोप:
परमबीर सिंह यांनी आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले होते. तत्पुर्वी, गृहविभागाने तक्राराच्या आधारावर चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये वसूलीचे आरोप केले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

परमबीर यांच्याविरोधात ही दुसरी चौकशी:
राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्याविरोधात दुसऱ्यांदा चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अँटिलिया प्रकरणातील तपासात अपयशी ठरल्याच्या आरोपावरुन गृह विभागाने सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. सिंह यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरुन 17 मार्च रोजी हटवण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: State govt gave permission to ACB over open enquiry of Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x