14 December 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

खरंच दिग्गज नेते की कृत्रिम राजकीय फुगवटा? सी आर पाटील गुजरातमध्ये हिरो आणि ग्राम पंचायत निवडणुकीत झिरो, पॅनल पराभूत

Maharashtra Grampanchayat Election

BJP CR Patil | महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसह जनतेलाही होती. प्रतिक्षा संपली असून, मतमोजणी सुरू झालीये. तब्बल 7 हजार 135 ग्रामंपचायतींसाठी मतदान झालं होतं. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये कुणाला गुलाल उधळण्याची संधी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे राज्यात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी स्थानिक नेत्यांसाठी निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर कोणता राजकीय पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकतोय, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत निवडणुकीत सी आर पाटील यांच्या कन्येचा पॅनल निवडणूक रिंगणात होता. गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेत मोलाचा वाटा असलेल्या सी आर पाटलांच्या कन्या निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे मोहाडीच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. मोहाडी गावात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. विशेष म्हणजे सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. सी आर पाटील यांच्या कन्या यांचा पॅनल पराभूत झाला असला तरी त्या स्वतः सदस्य पदी निवडून आल्या आहेत. सी आर पाटलांचाच एकप्रकारे हा परभव मानला जात असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Grampanchayat Election Result CR Patil check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Grampanchayat Election(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x