4 August 2020 1:43 PM
अँप डाउनलोड

सालाबादाप्रमाणे आयोजित होणारा अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला

मुंबई : अंधेरी पूर्व येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असणारा भव्य अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या फेस्टिवलचे दरवर्षी मुंबई अंधेरी पूर्व येथे भव्य आयोजन करण्यात येते. जीवन ज्योत प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल त्यांच्या पत्नी व नगरसेविका केसरबेन पटेल यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी या फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात येते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान, सदर फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भारतातील विविध परंपरांची झलक अनुभवता येते. प्रतिवर्षी या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते आणि यंदा सुद्धा तोच कल पाहायला मिळेल असेच चित्र आहे. जीवन ज्योत प्रतिष्ठान स्थानिक लोकांशी विविध लोकोपयोगी उपक्रमातून भावनिक दृष्ट्या जोडली गेल्याने लवकरच सुरु होणाऱ्या या फेस्टिवलला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद लाभेल यात शंका नाही.

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका केसरबेन पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून हा फेस्टिवल दरवर्षी चर्चेचा विषय बनत राहिला आहे. या फेस्टिवलच्या आयोजनाची अधिकृत घोषणा स्वतः नगरसेवक मुरजी पटेल यांनी केल्याने स्थानिकांची उत्सुकता वाढली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x