23 March 2023 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार? Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
x

महिलांवरील अत्याचार हा साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी चिंतेचा विषय | संसदेचं ४ दिवसाचं अधिवेशन बोलवा - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई, २१ सप्टेंबर | उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं म्हणत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. उद्धव ठाकरे यांनी आता पलटवार करत हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी असं म्हटलं आहे.

महिलांवरील अत्याचार हा साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी चिंतेचा विषय, संसदेचं ४ दिवसाचं अधिवेशन बोलवा – CM Uddhav Thackeray reply to governor Bhagat Singh Koshyari over letter to call special assembly session :

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र जशास तसं:
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठविलेले पत्र मिळाले. राज्यातील महिला असुरक्षित आहेत, असा आपला एकंदरीत सूर दिसतो. विशेषतः साकीनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय महिला मंडळांची शिष्टमंडळे राजभवनावर आपल्या भेटीस आली. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याने याबाबत विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करावी, अशा आपल्या भावना आहेत. मी आपल्या भावना समजू शकतो. आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात. आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे. कायदा सुव्यवस्था, महिलांचे हक्क, रक्षण ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीच असते. या संसदीय प्रथा-परंपरांच्याच जाहीर चौकटीतून आपणही गेलेले आहात. त्यामुळे आम्हाला आपल्या अनुभवांचा नेहमीच फायदा झाला आहे.

बलात्काराची राजधानी अशी नाचक्की:
महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना राज्य देश व समाजालाच कलंकित करतात, याची जाणीव मला आहे. साकीनाक्यातील घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार कठोर पावले टाकत आहे. पण महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. गेल्या काही वर्षांत दिल्लीतील महिला अत्याचारांत कमालीची वाढ झाली. जगात दिल्लीची बदनामी झालीच व बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली. दिल्लीची कायदा सुव्यवस्था हा केंद्राचा विषय आहे. हे खास नमूद करण्याची गरज नाही.

संसदेचं चार दिवसाचं अधिवेशन बोलवा:
साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: CM Uddhav Thackeray reply to governor Bhagat Singh koshyari over letter to call special assembly session.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x