15 December 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, विधानसभेसाठी नाही - बी एस येडियुरप्पा

B S Yediyurappa

बंगळुरू, २१ सप्टेंबर | केवळ मोदी लाट पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकत नाही. मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, परंतु राज्यात निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील, असं मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केले. रविवारी बेंगळुरूमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भारतीय जनता पक्षाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, विधानसभेसाठी नाही – Modi wave will not help to win assembly elections said B S Yediyurappa :

मोदी केंद्रात खूप काम करत आहेत. पुढील निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान होतील. पण राज्यातील काँग्रेसला जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे आपण अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ स्तरापासून पक्षबांधणी करायला हवी, तरच आपण काँग्रेसला धडा शिकवू शकतो. हानेगल आणि सिंदगी मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे,” असंही येडियुरप्पा म्हणाले.

शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, डीव्ही सदानंद गौडा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार काटील यांच्या नेतृत्वाखाली चार संघ आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि निवडणुकीतील संभाव्यता जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा करतील, तसेच पक्षाच्या उणीवांवर या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाई, असा निर्णय घेण्यात आला आहे. हा दौरा ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Modi wave will not help to win assembly elections said B S Yediyurappa.

हॅशटॅग्स

#Yediyurappa(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x