19 April 2024 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मराठा आरक्षण | फडणवीसांचं विधान म्हणजे खोटे बोला पण रेटून बोला असा प्रकार - अशोक चव्हाण

Minister Ashok Chavan, Devendra Fadnavis, Maratha reservation

मुंबई, १० मार्च: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वाद सुरू झाल्याचे आज पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिलेला आहे. आता यावर अशोक चव्हाणांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण हे कोणाच्याही मालकीचे नाही आणि खोटे बोल पण रेटून बोला असे फडणवीसांचे आहे असे म्हणत अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले आहे. (Minister Ashok Chavan slammed Devendra Fadnavis over Maratha reservation does not belong to any party)

अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने चुकीची आहेत. खोटे बोला पण रेटून बोला अशा प्रकारचे त्यांचे विधान आहे. मी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती विधानसभेत दिलेली नाही. मराठा आरक्षण लागू व्हायला हवे हीच आमची भावना आहे’ असे अशोक चव्हाणांनी स्पष्ट सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये वेगळी आणि केंद्रात वेगळी भूमिका घेऊ नये:
पुढे अशोक चव्हाण म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जी भूमिका मांडली, तेच मी विधानभवनात सांगितले आहे. फडणवीस म्हणतात की, तो जुनाच कायदा आहे व 102 ची घटनादुरूस्ती लागू होत नाही. मग केंद्र वेगळी भूमिका का घेत आहे? असा सवाल देखील अशोक चव्हाणांनी उपस्थित केला. तसेच चव्हाण म्हणाले की, आरक्षण हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकिचा विषय नाही. तेव्हा सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. आता यावर राजकारण करू नका. लोकांना उसकवण्याचे काम करू नये. यासोबतच भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये वेगळी आणि केंद्रात वेगळी भूमिका घेऊ नये. हक्कभंगाला मी उत्तर देणारच आहे’ असे म्हणत अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले आहे.

 

News English Summary: Today, it was seen that political controversy started in the budget session on the issue of Maratha reservation. Bharatiya Janata Party (BJP) Leader of the Opposition Devendra Fadnavis has warned Congress Minister Ashok Chavan against infringing on his rights. Now Ashok Chavan has also responded strongly. Ashok Chavan has slammed Fadnavis, saying that reservation does not belong to anyone and it is up to Fadnavis to tell lies but retweet.

News English Title: Minister Ashok Chavan slammed Devendra Fadnavis over Maratha reservation does not belong to any party news updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x