28 September 2022 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा
x

Maratha Reservation | सुप्रीम कोर्टात 8 मार्चपासून प्रत्यक्ष अंतिम सुनावणीला

Supreme Court, Maratha Reservation

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: महाराष्ट्रातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाची सुनावणी आज (५ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, या मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती.

मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, यावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार होतं. त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात 8 ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. 8, 9 आणि 10 मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. 12,15 आणि 16 मार्च सह 17 मार्चला या प्रकरणातील इतर बाजू ऐकून घेतल्या जातील. त्यानंतर महाधिवक्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान मराठा आरक्षणावर सुनावणी होईल.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यानच सकारात्मक संकेत देत तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजे तोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असेल असं सांगितलं होतं. राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली होती.

मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

 

News English Summary: The important issue in Maharashtra is the Maratha reservation. The hearing on the Maratha reservation was held today (February 5) before a five-judge bench of the Supreme Court. Therefore, it would be important to see whether the moratorium on Maratha reservation will be lifted. Meanwhile, in the meantime, the Maratha community had taken an aggressive stance on the issue of Maratha reservation. Ashok Chavan’s resignation was also repeatedly demanded.

News English Title: Supreme Court Maratha Reservation Hearing Constitution Bench Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x