12 December 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

सावध राहा! राज्यात ७२% कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत

ICMR, Maharashtra Covid 19

मुंबई, २५ मे : देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये ७१ टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यातही राज्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे.

राज्यामध्ये ७२ टक्के प्रकरणांमध्ये लक्षण दिसत नाहीत. फक्त २३ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणं दिसून आलीत अशी माहिती आयसीएमआरच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. शिवाय राज्यातील ५ टक्के प्रकरणं गंभीर आहेत, तर राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के आहे. असंही आयसीएमआरच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रातील स्थिती अधिकच खराब झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. रविवारी राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल ३ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला. राजधानी मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ७२५ रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या ३० हजार ५४२ वर गेली. २४ तासांमध्ये मुंबईत ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ९८८ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत.

 

News English Summary: Maharashtra has the highest number of corona virus cases in the country. In Maharashtra, 71 per cent people are infected with corona virus. It also shows no signs of corona virus in most cases in the state. This information has been given by the sources of Indian Council Medical Research (ICMR).

News English Title: 71 percent corona virus patient in Maharashtra state 72 percent asymptomatic say ICMR source News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x