20 September 2021 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस
x

मराठा मोर्चाला सुरुवात | संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल | सर्व पक्षांचा पाठिंबा

Maratha reservation

मुंबई, १६ जून | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज कोल्हापुरातून आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. खासदार संभाजी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन सुरु झालं असून राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळी काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येतं आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि रायगड अशा राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी बोलतील, आम्ही ऐकू, असे संभाजीराजे यांनी मंगळवारी सांगितले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आंदोलनासाठी मंत्री, खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मूक आंदोलनानंतर मुंबईत विधान भवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हावार बैठका घेण्यात येणार आहेत. लाँग मार्चबाबत आज चर्चा व घोषणाही होण्याची शक्यता आहे.मंगळवारी आंदोलनाच्या तयारीसाठी संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने आचारसंहिताही जाहीर करण्यात आली. या आंदोलनास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला आहे.

या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maratha Morcha Kolhapur today Maharashtra Maratha reservation demands by Sambhaji Raje Chhatrapati news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x