14 June 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू

Heavy Rain, 48 Dead, Maharashtra, crops damaged

पुणे, १७ ऑक्टोबर : राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे तर लाखो हेक्टवरील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यावर झालेला हा मोठा आघात असून शासनाच्या मदतीकडे सारेच आस लावून बसले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही विभागांतील स्थितीचा आढावा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.

पुणे जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बागायती शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. पुणे जिल्ह्यातल्या बागायती पट्यातलं नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वाहून गेलेले कांदा. सडलेला बटाटा, टोमॅटोचा झालेला लाल चिखल आणि भुईसपाट झालेला ऊस. सुजलाम सुफलाम असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर परिसरातील प्रत्येक शेतात कमी अधिक फरकानं हेच चित्रं दिसत आहे. परतीच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिनीवरच्या पिकं मातीमोल केली आहेत.

 

News English Summary: Pune, Aurangabad and Konkan divisions of the state have been hit hard by the return rains for the last three days. Extreme levels of rainfall and floods have so far claimed the lives of 48 people and destroyed millions of hectares of crops. This is a big blow to the farmers and they are waiting for the help of the government. Meanwhile, Chief Minister Uddhav Thackeray has reviewed the situation in the three divisions and Prime Minister Narendra Modi has also approached the Chief Minister and assured him of full cooperation.

News English Title: Rains claim 48 lives in Maharashtra crops damaged extensively News updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x