19 April 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

संभाजीनगर: ३ दशकानंतर सुचलं? आता फक्त विकासकामांवरच बोलेन: आदित्य ठाकरे

Environment Minister Aaditya Thackeray, Sambhajinagar, Aurangabad

औरंगाबाद: काल औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीत लढली जाणार हे वृत्त पसरताच शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तातडीने औरंगाबादला धाडण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील औरंगाबादच्या दौऱ्यावर असल्याने शिवसेनेत धावपळ वाढली आहे आणि त्याच मुख्य कारण म्हणजे मनसेने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर कारण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

१९८८ पासून औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण करत हिंद्त्वाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रभर पसरलेली शिवसेना केंदात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत बसून देखील संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा मार्गी लावला नाही. याच मुद्यावर ३ दशक केवळ राजकरण करत स्वतःची घरं भरण्याचा कार्यक्रमाचं सुरु ठेवला असं आज स्थानिक लोकच बोलू लागले आहेत. साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी कचराकोंडीमुळे दंगल उसळणारं पहिलं शहर म्हणजे औरंगाबाद अशी ओळख देखील झाली होती. शहरातील अस्वच्छता आणि मूलभूत पायाभूत सुविधांचा अनेक वर्ष बट्याबोळ झाल्याचं पाहायला मिळतं.

मात्र सध्या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वावरून मनसे आक्रमक होताच आदित्य ठाकरे यांनी औरंबादमध्ये धाव घेतली आहे. यावेळी विमानतळावर त्यांचं आगमन होताच प्रसार माध्यमांनी त्यांना या विषयवार बोलतं करण्याच्या प्रयत्न करताच त्यांनी, आज निवडणुकीवर, राजकारणावर बोलणार नाही, तर फक्त विकासकामांवरच बोलेन, असं उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे तब्बल ३ दशकं केवळ संभाजीनगर नामकरणावरून केवळ राजकारण करणाऱ्या शिवसेनेला आज अचानक विकासाची उपरती झाली आहे हे विशेष म्हणावं लागेल.

पुढे पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, ‘ऑरिक सिटीत अनेक उद्योग येऊ पाहात आहेत. हे काम अजून पुढे वाढतच जाईल. स्थानिकांना रोजगार मिळेल. राज्याच्या महसूलात वाढ होईल. सायकल ट्रॅक पाहून आनंद झाला. पोलिस हौसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून त्यांच्या प्रकल्प नियोजनात या बाबी आहेत.’

 

Web Title: Envirinment Minister Aaditya Thackeray talked on Sambhajinagar Issue.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x