मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील १८० तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करण्यास सरकार कडून सुरुवात होणार असून लवकरच केंद्राचं पथक सुद्धा येणार असल्याचे फडणवीसांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच टँकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण व यांसह एकूण ८ उपाययोजना लागू करण्यात येतील. केंद्रीय पथक दुष्काळसदृश परिस्थितीची संपूर्ण पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येणार असून, त्यानंतर मदतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
