6 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024 IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News
x

शिवसेनेचा पारंपारिक मतदार 'कोंकणी-माणूस' दुरावण्याची शक्यता : सविस्तर

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं २०१४ मधील कणकवलीत झालेलं भाषण आज सुद्धा कोकणी माणसाच्या चांगलं लक्षात आहे. त्यांनी भर सभेत दिलेली वचन आणि सरकार आल्यावर घडलेल्या घटनाक्रमाने कोंकणी माणूस शिवसेनेवर नाराज असल्याचे समजते. मग तो कोकणातला स्थायिक असो किंव्हा मुंबई – ठाण्यात राहणारा चाकरमानी.

आमचा खासदार आणि आमदार निवडून द्या मी स्वतः जातीने कोकणच्या विकास कामात लक्ष घालेन हा उद्धव ठाकरेंचा भर सभेतील शब्द कोकणी माणूस कधीच विसरणार नाही. २०१४ मध्ये कोकणी माणसाने विशेष करून सिंधुदुर्ग पट्यात शिवसेनेला भरभरून मतदान केलं. ‘कोकणची माणसं साधी भोळी’ हे वाक्य उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना भाषणा दरम्यान बोलून दाखवलं होत.

परंतु सत्तेत आल्यावर चार वर्ष शिवसेनेकडून कोकणात कोणतीच विकासाची कामं झाली नाहीत आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोकणावर काय लक्ष ठेवलं हे कोकणी माणसाला चांगलंच उमगलं आहे. सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती बघता, शिवसेना पूर्ती गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे सर्वच माध्यमांच्या चर्चेतून दिसत आहे.

कोकणी माणूस हा मुळातच निसर्ग प्रेमी माणूस. त्या कोकणच्या निसर्ग प्रेमापोटीच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात नोकरी धंद्यासाठी स्थिरावलेला कोकणाचा माणूस त्यांच्या ‘गावात’ जाण्याचा बहाणाच शोधत असतो हे सत्य आहे. कोकणी माणसाला विकास नको आहे हे धादांत खोटं असल्याचं कोकणी माणूस बोलून दाखवतो. परंतु निसर्गरम्य कोकणात पर्यटनातून आणि फळ उद्योगातून प्रचंड मोठा रोजगार आणि देशाला परकीय चलन सुद्धा मिळू शकत हे राज्यकर्त्यांना कळत का नाही ही हुरहूर त्यांच्या मनात आहे. अगदी ‘एनरॉन’ सारख्या प्रकल्पाने काय हाती लागलं हे सर्वश्रुत आहे.

त्यातच नाणार रिफायनरी प्रकल्प आणि निर्माण झालेली परिस्थिती पाहता कोकणी माणसाच्या मनात शिवसेनेबद्दलचा रोष खूप वाढला आहे. २०१४ मधील कणकवलीतील भर सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणी माणसाला वचन दिलं होत की,’कोकणच्या विकासात मी स्वतः लक्षं घालेन’. पण प्रत्यक्ष कोकणच्या निसर्गाला, खाडी, अरबी समुद्र आणि नद्यांना विनाशकारी ठरणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणांत आला आणि शिवसेनेबद्दल रोष वाढतच गेला.

शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्यानेच नाणारमधील जमीन भूसंपादनाचा अध्यादेश जरी केला आणि कोकणात एकच संतापाची लाट उसळली. कोकणी माणसाने तर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला की, ‘आधी उद्योग खात्याने जरी केलेला जमीन भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करा आणि मगच कोकणात पाय ठेवा’. सेनेचा पारंपरिक मतदार असलेल्या कोकणी माणसाचा हा इशारा सर्व काही सांगून जातो.

आपल्या पारंपरिक कोकणी मतदारानेच थेट इशारा दिल्याने शिवसेना पूर्ती गोंधळली आणि काही करून कोकणात सभा आयोजित करण्याचे ठरवले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार जमीन भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करत असल्याचे जाहीर केले. ही घोषणा होते न होते तशी पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं की मंत्र्यांना भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याचा अधिकारच नसतो. तिथेच कोकणी माणसाच्या लक्षात आलं की शिवसेना केवळ वेळ मारून नेण्यासाठी आणि सामान्य कोकणवासीयांच्या प्रशासकीय अज्ञानाचा फायदा घेऊन, आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्याने खूपच संतापला आहे.

निसर्ग-वेडा आणि गावं-वेडा शहरी कोकणी माणूस आता लवकरच सह-कुटुंब कोकणातील आपल्या गावी सुट्टी निमित्त प्रयाण करेल. त्यावेळी कोकणातल्या घराघरात ही चर्चा रंगणार आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे संपूर्ण कोकणात आणि शहरी भागातल्या कोकणच्या भोळ्या माणसाने, जर येत्या निवडणुकीत शिवसेनेला ‘कोकणी-बाणा’ दाखवला तर नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x