27 November 2022 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 28 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे?
x

बाळासाहेब ठाकरे देवाघरी गेल्यानंतर दोन वेळा खासदारकी, तरी किर्तीकर म्हणाले बाळासाहेब गेले अन् मला डावललं, शिंदेंची स्क्रिप्ट?

Shivsena MP Gajanan Kirtikar

MP Gajanan Kirtikar | उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे नेतेपदही काढून घेण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षात सतत डावलले
काल प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि खासदार भावना गवळी उपस्थित होते. मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी कीर्तिकर यांनी व्यक्त केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपल्याला पक्षात सतत डावलले गेल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काढलेल्या पत्रकात काय म्हटलं
शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे असा मजकूर या पत्रकात छापण्यात आला आहे.

ते आधीच स्पष्ट झालं होतं
मागील अनेक दिवसांपासून खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. या दरम्यान त्यांची अनेकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेटी-गाठी झाल्या होत्या. तसंच किर्तीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही टीका करण्यात आली होती. मात्र किर्तीकर यांच्याकडून या सर्व चर्चांच सातत्यानं खंडन करण्यात येत होतं. अखेरीस या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MP Gajanan Kirtikar joins Shinde camp check details on 12 November 2022.

हॅशटॅग्स

#MP Gajanan Kirtikar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x