19 October 2021 7:54 AM
अँप डाउनलोड

मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणांविरोधात बँका संपावर, ५ दिवस बँका बंद

नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या मागील सर्व प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने अर्थात ‘AIBOC’ उद्यापासून तब्बल ५ दिवसांसाठी संपावर जाणार आहेत. त्यात हे ५ दिवस आल्याने अनेकांची आर्थिक गैरसोय होण्याची शक्यता आहे. उद्या २० डिसेंबरनंतर सलग ५ दिवस बँका बंद राहणार असल्यानं २० तारखेच्या आधीच आपण बँकांमधील सर्व महत्वाचे व्यवहार आटोपून घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणाविरोधात हा संप देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला संघटना धारेवर धरणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा सुद्धा या संपाच्या मूळ केंद्रस्थानी असणार आहे.

त्यात २२ आणि २३ डिसेंबरला शनिवार, रविवार असल्यानं वास्तविक बँकांना सुट्टीच असते. परंतु, २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुद्धा सुट्टी असल्यानं बँका ५ दिवस बंद राहणार आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x