5 August 2020 3:38 PM
अँप डाउनलोड

त्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, आमच्याजवळ पुष्कळ नेते मंडळी आहेत, परंतु त्यातील काहींना माध्यमांकडे जायला आणि पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला सर्वप्रथम त्या उत्साही नेत्यांना दुसरं काही तरी काम देण्याची नितांत आवश्यकता आहे, असं थेट सल्ला गडकरी यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी गडकरींनी १९७२ मधल्या ‘बाँबे टू गोवा’मधील या हिंदी चित्रपटातील एका दृश्याचं उदाहरण दिलं. ज्यामध्ये आई-वडील मुलांना खाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा घालतात.

सध्या आमच्या भाजपमधील काही वाचाल वीरांना अशाच प्रकारच्या कापडाच्या गोळ्याची नितांत गरज आहे. परंतु, पक्षाकडून गप्प राहण्याचा आदेश हा थेट हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र काढणाऱ्यांसाठी आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते सर्व मस्करीत बोलल्याचं सांगत वेळ मारून नेली असं दिसलं.

पुढे गडकरी प्रश्नोत्तरांदरम्यान म्हणाले की, मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती अर्थात ‘जेपीसी’च्या नियुक्तीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले का,जेपीसी सुप्रीम कोर्टापेक्षा मोठी आहे काय, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही नितीन गडकरी पुढे म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x