13 December 2024 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

आजचे राशिभविष्य | गुरुवार | ०५ नोव्हेंबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी भविष्य (Aries Today’s Horoscope) : आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Today’s Horoscope) : आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक क्षेत्रांतील नवनवीन विचार मनात निर्माण होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. काम-धंद्यात यश आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Today’s Horoscope) : आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Today’s Horoscope) :  उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे, आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. पैशांचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. नोकरी आणि कामा-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मनावर संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करू शकता.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Today’s Horoscope) : स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Today’s Horoscope) : काम-धंद्यासाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होईल, भाग्य उजळेल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. सहकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Today’s Horoscope) : घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Today’s Horoscope) : घरातील सदस्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होईल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Today’s Horoscope) : आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Today’s Horoscope) : धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांत वाढ होईल. व्यवसाय आणि नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नकारात्मक विचारांमुळे मन अस्थिर राहील. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Today’s Horoscope) : काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Today’s Horoscope) : कोणतेही कार्य करतांना काळजी घ्या. सरकारी कामात यश मिळेल. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल.

Article English Summary: दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राश‍ी भविष्य, वृषभ राश‍ी भविष्य, मिथुन राश‍ी भविष्य, कर्क राश‍ी भविष्य, मकर राश‍ी भविष्य, सिंह राश‍ी भविष्य, कन्या राश‍ी भविष्य, तूळ राश‍ी भविष्य, वृश्चिक राश‍ी भविष्य, धनु राश‍ी भविष्य, कुंभ राश‍ी भविष्य, मीन राश‍ी भविष्य यांचा समावेश आहे.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 05 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x