27 July 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

निवडणुकीआधी भाजप मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांमार्फत पोलीस अधिकाऱ्यांच्या खुलेआम बदल्या?

मुंबई : सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना भाजपकडून मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले समजले जातात. त्यांनी थेट मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागी कोणाला नियुक्त करावे, यासाठी गिरीश महाजनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे शिफारस पत्र पाठविण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

त्यातील पहिलं शिफारस पत्र हे मुंबईमधील मुलुंड पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथे कोणाची नियुक्ती करावी याची थेट शिफारस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानुसार अशोक मंगळू बोरसे हे सध्या सशस्त्र पोलीस वरळी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. परंतु, मुलुंड पोलीस स्टेशनचे विद्यमान वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे त्याजागी अशोक मंगळू बोरसे यांची नेमणूक करण्यात यावी अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आणि भविष्यातील प्रशासनाचा दूरउपयोग करता यावा यासाठी तर भाजपचे मंत्री आधीच सर्व काळजी घेत नाहीत ना? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता असून, संबंधित अधिकारी खुलेआम वशिले बाजीची पत्र समाज माध्यमांवर टाकत आहेत. उद्या याच अधिकाऱ्यांचा उपयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने करून घेतल्यास नवल वाटायला नको.

काय आहे ते नेमकं शिफारस पत्र?

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x