29 September 2022 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Plus Size Styling Tips | प्लस साइज असल्यानंतरही तुम्हाला हवा तसा लुक शक्य आहे, चिंता सोडा, या स्टाइलिंग टिप्स फॉलो करा Viral Video | लग्नात नवरी मुलगी रडू लागली, तेवढ्यात मैत्रीनीने तिच्या कानात असं काय सांगितलं की लगेच शांत झाली... पहा व्हिडीओ Penny Stocks | या 8 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 6 पट परतावा दिला, स्टॉक तेजीने पैसा वाढवतोय, नाव नोट करा CIBIL Score | खराब क्रेडिट स्कोअर असल्यामुळे कर्ज मिळत नाही?, तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा Viral Video | गुंड बाईक वरून उतरला आणि त्या व्यक्तीवर रिव्हॉल्वर रोखून मोबाईल-पैसे काढ म्हणाला, पुढे असं धक्कादायक घडलं Multibagger Mutual Funds | लॉटरी लागली, या म्युचुअल फंडाने 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 9 कोटी रुपये परतावा दिला, योजना नोट करा Horoscope Today | 29 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

उ. महाराष्ट्रात भाजप आधीपासून मजबूत | पवार ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत

BJP MLA Prasad Lad, Eknath Khadse, Sharad Pawar

मुंबई, १७ नोव्हेंबर: अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालू आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसेंचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करू द्या,’ अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आधीपासून मजबूत आहे आणि यापुढे देखील राहील. शरद पवार हे मागील ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत. त्यांचे दौरे नवीन नाहीत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. मात्र, खडसेंच्या जिल्ह्यात दौरा केल्यामुळं भाजप कमकुवत होईल, असं मानण्याचं कारण नसल्याचेही लाड म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर घेतले आहे, अशी टीका भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केली. एकनाथ खडसे यांच्या राजकीय तकदीबद्दल खूप फुगवून सांगितले जाते आहे असे सूचित करताना लाड म्हणाले, खडसे यांच्यात इतकी ताकद होती तर मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?

 

News English Summary: Recently, many important developments are taking place in the politics of Maharashtra. Opposition leaders do not leave any stone unturned to target the ruling party. The game of impeachment between the opposition and the ruling party continues unabated. Similarly, now BJP leader Prasad Lad has targeted the NCP over Eknath Khadse’s defection.

News English Title: BJP MLA Prasad Lad criticized Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x