17 May 2021 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

कंगना राणौत झाशीची राणी आहे | तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही - राम कदम

BJP MLA Ram Kadam, Bollywood actress Kangana Ranaut, Queen of Jhansi, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे राऊत म्हणाले. तत्पूर्वी “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली होती.

दरम्यान, यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेना नेत्यानं पुन्हा एकदा निंदनीय विधान केलं आहे. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच कंगना रानौत झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असं देखील राम कदम यांनी सांगितले.

 

News English Summary: BJP leaders have paid attention to Shiv Sena. Shiv Sena leader has once again made a reprehensible statement. Mahavikas Aghadi has put pressure on Mumbai Police for its own interests. So that Sushant does not get justice. Ram Kadam has alleged that his aim is to protect the Bollywood drug mafia. Also Kangana Ranaut is the queen of Jhansi.

News English Title: BJP MLA Ram Kadam has said that Bollywood actress Kangana Ranaut is the queen of Jhansi Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Kadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x