31 October 2020 12:02 PM
अँप डाउनलोड

Alert | मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागूच राहणार | पुण्यात?

Mumbai Police, Section 144, Imposed in Mumbai city, Marathi News ABP Maza

मुंबई, १७ सप्टेंबर : मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने जमावबंदीचा आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काल मुंबई पोलिसांच्या डीसीपी ऑपरेशन्सने सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत एक आदेश जारी केला आहे, जो मुंबई शहरात ३० सप्टेंबरपर्यंत लागू असेल. ३१ ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडून लॉकडाउनच्या फेज (टप्प्या) निहाय शिथिलता (मिशन बिगईन अगेन) संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई पोलिसांकडून हा आदेश काढण्यात आला आहे. यात कोणतेही नवीन निर्बंध लादलेले नाहीत, अशी माहिती पोलीस अधिकारी एन. अंबिका यांनी दिली. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे.

मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील आणत आहे. मात्र, दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका आता नव्या उपाय योजना करणार आहे. मुंबई प्रमाणेच नागरिकांसाठी आता आचारंहिता लागू करण्यात येणार आहे. शुक्रवार (18 सप्टेंबर)पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येण्याची शक्यता आहे.

या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे. तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. नियमांच पालन न करणाऱ्या 5 दुकानदारांविरुद्ध महापालिकेने कारवाई केली आहे.

 

News English Summary: In view of the current situation in Mumbai, the administration has issued a curfew due to the growing number of corona patients. It has been decided to impose a curfew in Mumbai from midnight today. Orders have been issued by the Mumbai Police Commissionerate in this regard. So there are restrictions on traveling together.

News English Title: Mumbai Police Section 144 to be imposed in Mumbai city from midnight tonight Marathi News LIVE latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x