14 December 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोना आपत्ती: मुंबई पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर; मनसेकडून मोफत मास्क किट वाटप

Mumbai Police, Corona Crisis, MNS Mask Kit

मुंबई, २० मार्च : कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोना संदर्भात नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना येत आहे. दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, आज अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या डॉक्टरचे सॅम्पल घेतले गेले मात्र ते पुण्याला पाठवलेच नाहीत अशी गंभीर बाब देखील इथे निदर्शनास आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी हे सॅम्पल पाठवले अपेक्षित होते. पण त्यांनी हे सॅम्पल पुण्याला पाठवले नसल्याचा आरोप महिला डॉक्टरने जिल्हा शल्य चिकित्सकांवर केलाय.

एकूण डॉक्टर, नर्स किंवा पोलीस यंत्रणेला कोणताही आराम नसला तरी प्रशासनाने त्यांचा सुरक्षेची नेमकी कोणती जवाबदारी घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. दरम्यान, काही समाजसेवकांनी पुढाकार घेऊन अशा यंत्रणांची काळजी घेण्याचे उपक्रम देखील राबविण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तसाच सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम मनसेच्या बोरिवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राबवला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेहमीच कर्तव्यास तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोरिवलीतील पदाधिकाऱ्यांनी बोरिवली विधानसभेतील सर्व पोलीस ठाण्यात ‘मोफत मास्क किट’ वाटप केले आणि त्यांच्या पोलिसांच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summery:  In particular, only the female doctor examining the corona patient has found any symptoms of coronas. Serious cases of this doctor’s samples were taken but they were not sent to Pune. District surgeons were expected to send this sample. But the woman doctor accused the district surgeon of not sending the sample to Pune. While there is no relief for the entire doctor, nurse or police system, the question of whether or not the administration has taken the responsibility of their security is being raised. Meanwhile, it is seen that some social workers have started taking initiative to take care of such systems. Likewise, a social commitment initiative is being implemented by MNS office bearers and activists. In the wake of the Corona infection, police officers who are always on duty to protect the security personnel of Maharashtra Navnirman Sena’s Borivali allotted a ‘free mask kit’ to all the police stations in the Borivali assembly and see how they can take care of their police health.

 

News English Title:  Story MNS party Workers distributed Corona Protection Mask Kit to Borivali Police News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x