15 December 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन

SAARC video conference, News Latest Updates, corona virus, Covid19, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १५ मार्च: चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत COVID-19 साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

१. इतक्या कमी वेळेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. खास करून पंतप्रधान ओली यांचे मी आभार मानू इच्छितो, जे शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झालेत.

२. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला महारोग म्हणून घोषित केलंय. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्रातही जवळपास १५० रुग्ण समोर आलेत. आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे.

३. तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं. परदेशातून मायदेशात परतण्यासाठी आत्तापर्यंत १४०० भारतीयांना मदत केलीय. सोबतच शेजारील काही देशाच्या नागरिकांनाही आम्ही मदत करू शकलो.

 

News English Summery: The Corona virus that has been plagued by China has now created a worldwide crisis. Leaders of the SAARC (an economic and political cooperation organization of eight countries in Asia) discussed through a video conference on the backdrop of control of this global pandemic. In this special discussion, Prime Minister Narendra Modi said that fighting the crisis without fear is his mantra. He added that the growing challenge of the corona virus is a major challenge facing developing nations. We have taken proper steps from time to time to take control of it. The meeting was proposed by Prime Minister Narendra Modi to take a united discussion on the backdrop of Corona.

 

News English Title: Story corona virus outbreak covid19 Prime Minister Narendra Modi SAARC video conference News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x