6 May 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

कोरोनाचा उगम शोधा | अन्यथा कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयारी करा - शास्त्रज्ञांचा इशारा

India corona pandemic

नवी दिल्ली, ३१ मे |  कोरोना व्हायरस कधी आला, कुठून आला आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ घेत आहेत. आतापर्यंत दोन प्रकारच्या थेअरींवर सर्वाधिक बोलले जात आहे. पहिल्या थेअरीमध्ये कुठल्यातरी प्राण्यापासून कोरोना माणसांपर्यंत आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसऱ्या थेअरीमध्ये चीनच्या एखाद्या लॅबमध्ये कोरोना तयार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी एका रिपोर्टनंतर आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मागच्या आठवड्यात आय वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या लॅबमधील तीन शास्त्रज्ज्ञांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. तेव्हा चीनने जगाला कोरोना महामारीबद्दल सांगितले नाही.

दुसरीकडे, जगभरात याची चर्चा सुरु असून चिंता देखील वाढली आहे. अमेरिकेची मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून अमेरिकेच्या दोन वैज्ञानिकांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 च्या उगमाचा शोध घ्या नाहीतर कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयार रहा, असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर राहिलेले स्कॉट गॉटलीब आणि टेक्सासच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहाय्यक संचालक पीटर होट्स यांनी हा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे गॉटलीब हे सध्या कोरोना लस आणलेल्या फायझरच्या संचालक मंडळावर आहेत.

कोविड 19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी आणि भविष्य़ातील महामारींचा धोका रोखण्यासाठी चीनच्या सरकारने जगाची मदत करायला हवी. गॉटलीब यांच्या म्हणण्यानुसार चीनच्या लॅबमधूनच कोरोनाचा जन्म आणि प्रसार झाल्याचा जगाच्या दाव्यांना आणखी काही ठोस पुरावे सापडले आहेत. याचसोबत चीनने हे पुरावे खोटे ठरविण्यासाठी काहीच माहिती दिलेली नाहीय. तर होट्सनी म्हटले की, ज्या पद्धतीने कोरोना पसरला आहे त्यानुसार भविष्यात देखील महामाऱ्या पसरण्याचा धोका वाढला आहे.

 

News English Summary: Co-director of the Texas Children’s Hospital Center for Vaccine Development, Peter Hotez said in a TV appearance on Sunday that not knowing how the pandemic began and confusion about its actual origin puts the world at risk of future outbreaks. “There’s going to be COVID-26 and COVID-32 unless we fully understand the origins of COVID-19,” Hotez said in a live-streamed address on NBC’s “Meet the press.

News English Title: Find Covid 19 Origin Or Face Covid 26 And Covid 32 pandemic alert by US Experts news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x