5 May 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगनार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष चिन्ह आणि नाव जाहीर

Uddhav Thakceray

Shivsena Vs Shinde Camp | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि ठाकरे गटाला सोमवारी नाव आणि चिन्हांचे वाटप केले. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाने दिलेले तिन्ही चिन्हं हे धार्मिक असल्याने ती बाद ठरविण्यात आले असल्याने अद्याप कोणतेही चिन्ह देण्यात आलेले नाही. शिंदे गटाला चिन्हांचे आणखी तीन पर्याय देण्याचे निर्देश दिले आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

ठाकरे गटाने नवीन नावासाठी तीन पिढ्यांची नावे वापरून निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे 3 पर्याय ठाकरे गटाने दिले होते. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde gets Balasahebanchi Shivsena name and Uddhav Thackeray gets Shivsena Uddhav Balasaheb Thackeray 10 October 2022.

हॅशटॅग्स

Uddhav Thakceray(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x