सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं वास्तव, तासाभरातच विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदेंच्या 40 आमदारांचा कार्यक्रम निश्चित झाला?
DCM Ajit Pawar | महाराष्ट्रात झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी फुटला असून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच पाच वर्षांच्या कार्यकाळात पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. याआधी 2019 मध्ये अजित पवार यांनी आपल्या काकांविरोधात बंड केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. नंतर ते उद्धव यांच्या सरकारमध्ये आणि आता तिसऱ्यांदा शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
तासाभरातच विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री झाले
रविवारी मुंबईत घडामोडी इतक्या वेगाने बदलल्या की कुणालाच याची कल्पना आली नाही. अजित पवार यांच्यासह १७ आमदारांनी राजभवनावर मोर्चा वळवला. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या, मात्र त्या लगेचच निघून गेल्या.
त्या बैठकीला शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दुसरीकडे पुण्यात असलेल्या शरद पवार यांनी आपला आजचा दौरा रद्द केला. अजित पवार काहीतरी गडबड करणार आहेत हे त्याच्या लक्षात आले होते पण एवढ्या लवकर सगळं घडेल याची त्यांना देखील कल्पना नव्हती असं म्हटलं जातंय. अजितदादांनी बैठक बोलावली तेव्हा शरद पवार यांनी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून तसा अधिकार असल्याचे सांगितले होते.
कोण मंत्री झाले?
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, संजय बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. प्रफुल्ल पटेल हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांची आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि शिंदे गटातील आमदार
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने शिवसेना फुटीवर निर्णय दिला असून त्याला जवळपास ३ महिने झाले आहेत. राज्य सरकारकडून केवळ वेळ ढकलण्याचे काम सुरु आहे. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने नसल्यानेच त्यावर कारवाईच्या हालचाली होतं नसल्याचं घटना तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र कोर्टाने सर्व गोष्टी मुद्देसूद नमूद केल्याने त्यात राजकीय खोडसाळपणा करणे अशक्य असल्याने भाजपने निवडणुकीपूर्वीच तोडगा काढून अजित पवारांच्या मार्फत ४० आमदारांची आधीच सोय केली आहे. अजित पवारांच्या मार्गे भाजपने शिंदे गटाच्या पतानाचा मार्ग मोकळा केल्याचं म्हटलं जातंय.
News Title : NCP Leader Ajit Pwar take oath as DCM of Maharashtra check details on 02 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा