27 May 2022 5:33 AM
अँप डाउनलोड

इथिओपियातील विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू, ४ भारतीयांचा समावेश

Ethiopian Air Plane Crash

नैरोबी : इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या विमानातून एकूण १४९ प्रवासी आणि ८ कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल १५७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

इथिओपिया एअरलाइन्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांनी आदिस अबाबा येथून नैरोबीकडे रवाना झाले होते. दरम्यान, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यान, अपघातग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आदिस अबाबापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बिशोफ्टू येथे हा दुर्दैवी अपघात झाला आहे. ज्या विमानाला अपघात झाला आहे ते ७३७-८०० मॅक्स प्रकारातील होते. दरम्यान, इथिओपियाच्या पंतप्रधानांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

इथिओपिया एअरलाइन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथिओपिया एअरलाइन्सच्या या विमानातून जागतिक स्तरावरील एकूण तीस देशांचे प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये केनियाचे ३२, कॅनडाचे १८, इथोपियाचे ९, इटली, चीन आणि अमेरिकेचे ८, ब्रिटन व फ्रेंचचे ७, इजिप्त ६, डच ५, भारत व स्लोवाकियाचे ४, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि रशियाचे ३, मोरोकन्स, स्पॅनार्ड्स, पोल आणि इस्राइलचे २ प्रवासी प्रवास करत होते. तर बेल्जियम, इंडोनेशिया, सोमालिया, नॉर्वे, सर्बिया, टोगो, मोझाम्बिया, रवांडा, सुदान, युगांडा आणि येमेन देशाचे काही नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होते.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x