20 June 2021 8:38 PM
अँप डाउनलोड

राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Gujarat, Hardik Patel

बडोदा : गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून अधिकृतपणे याबद्दलची माहिती दिली. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान उद्या १२ मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची एक बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. ज्या जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल उभे राहणार आहेत तेथून सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांना नाकीनऊ आणले होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला मोठी मदत केली होती. यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x