7 August 2020 8:47 AM
अँप डाउनलोड

फडणवीस सरकार महाराष्ट्र सरकारच्या स्क्रिप्ट गुजरातीत करण्यात व्यस्त

Devendra Fadanvis, Raj Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला नाव न घेता प्रतिउउतर दिलं. दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे यांची स्क्रिप्ट सध्या बारामतीतून येते आणि ते त्याप्रमाणे बोलतात. परंतु, मागील काही महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या अनेक निर्णयाचे बारीक निरीक्षण केल्यास ते गुजरातमधून आलेल्या स्क्रिप्टप्रमाणे घेतलेले दिसतील. अगदी त्यात मराठी या राज्य भाषेला देखील सूट देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक मंत्रालय देखील राज्य सरकारच्यावतीने दिले जाणारे प्रमाणपत्र चक्क मराठी भाषेत न देता ते गुजराती भाषेत देत आहेत. गुजरात सरकार गुजरातील मूठ माती देऊन मराठीमध्ये असे प्रमाणपत्र कधीच देणार नाही. परंतु गुजरातच्या आशीर्वादानेच मंत्रीपदी बसलेले नेतेमंडळी महाराष्ट्राच्या भाषेचा जराही विचार न करता, राज्य सरकारची प्रमाणपत्रं थेट गुजराती भाषेत प्रदान करत आहेत. त्यामुळे आपण काय करत आहोत याच भान देखील फडणवीस सरकारला उरलेले नाही.

त्यामुळे आधी महाराष्ट्र सरकारची स्क्रिप्ट गुजराती भाषेत बदलण्याचे धंदे आधी राज्य सरकारने थांबवून, राज्य भाषेचा अनादर आणि मराठीवरील अतिक्रमण थांबवावं. अर्थात जर मंत्रिमंडळाची स्क्रिप्ट गुजरातमधून ठरत असेल तर फडणवीस सरकारदेखील कोणत्या सरकारचे पोपट आहेत ते आधी निश्चित करावं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(463)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x