28 June 2022 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

२०१९ पर्यंत चंद्रावरही ४ जी नेटवर्क : व्होडाफोन लंडन

नवी दिल्ली : पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आजही इंटरनेट नेटवर्क उपलब्ध नाही. परंतु २०१९ पर्यंत थेट चंद्रावरही ४ जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. तशी अधिकृत माहिती व्होडाफोनच्या लंडन स्थित कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आली आहे.

पुढील वर्षी म्हणजे २०१९ पर्यंत ४ जी नेटवर्क चंद्रावर उपलब्ध करण्यासाठी व्होडाफोन आणि नोकिया या दोन कंपन्या एकत्र आल्या असून तशी अधिकृत माहिती व्होडाफोनच्या लंडन स्थित मुख्यालयातून प्रसारित करण्यात आली आहे.

जर्मन स्थित एका खासगी स्पेस कंपनीने चंद्रावर लँडर आणि २ रोव्हर पाठविण्याची योजना आखली आहे. त्याच मिशनसाठी हे ४ जी नेटवर्क चंद्रावर उभारण्यात येणार आहे. फाल्कन ९ या एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटद्वारे ते रोव्हर चंद्रावर पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे.

नोकिया स्पेस ग्रेड अल्ट्रा कॉम्पॅक्ट चंद्रावर ४ जी नेटवर्कची निर्मिती करणार आहे अशी माहिती सुध्दा प्रसिध्द करण्यात आली आहे. केवळ एक किलो इतक्या हलक्या वजनाच्या म्हणजे साखरेच्या पिशवी इतके या उपकरणाचे वजन असेल अशी माहिती कंपनीने प्रसिध्द केली आहे. सध्या चंद्रावरील संशोधनात संवाद करण्यासाठी अॅनालोग्यु रेडिओचा वापर व्हायचा, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागायची. परंतु ४ जी नेटवर्कमुळे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून थेट लाईव्ह व्हिडीओ प्रसारित करेल जो पृथ्वीवरून पाहता येईल.

हॅशटॅग्स

#4G Network on Moon(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x