भाजपाला धक्का | संघाच्या मुशीतून घडलेल्या माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपाला रामराम
औरंगाबाद, १७ नोव्हेंबर: उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला आहे आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
मराठवाड्यातील मोठं राजकीय प्रस्त असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल ३ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. महत्वाचं म्हणजे त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसंच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य देखील होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.
यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. ‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम दिलं जात नाही,’ असा आरोप त्यांनी केला आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
News English Summary: Former Union Minister of State for Marathwada Jaysingrao Gaikwad has resigned from the primary membership of the Bharatiya Janata Party. It is noteworthy that Jaysingrao Gaikwad, who came from the Sangh’s mush, was working in the Bharatiya Janata Party from Jansangh. He had worked with Gopinath Munde for the expansion of the party in Marathwada. He was elected as an MP from Beed Lok Sabha constituency 3 times. He had also won twice from Marathwada graduate constituency. Importantly, he was the Minister of State for Co-operation in the State Cabinet.
News English Title: Former union minister Jaisingrao Gaikwad Patil quits BJP party news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News