15 May 2021 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आज 'महाराष्ट्र दिन'

मुंबई : आज ५९वा महाराष्ट्र दिन, संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आपण आपल्या प्रिय महाराष्ट्राचा अभिमानाने गौरव करतो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मराठी भाषिकांचं राज्य म्हणून जरी आपण हा दिवस साजरा करत असलो तरी त्यामागे अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे याची कल्पना नव्या पिढीला करून देणे हे वरिष्ठांनी परम कर्तव्य आहे.

त्याआधी म्हणजे १९६०साला पर्यंत महाराष्ट्र व गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. त्यानंतर मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या मागणीने जोर धरला होता. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई त्या मागणीला आडकाठी घालत मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली. नंतर मोरारजी देसाईना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पेटली होती. मुंबईतील आज भरडला गेलेल्या गिरणी कामगारांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठा वाटा होता. एक दोन नव्हे तर तब्बल १०५ हुतात्म्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलं होतं.

त्यामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी आपण सर्वजण महाराष्ट्र दिन साजरा करतो. या लढ्यात श्रमिकांचा मोठा वाटा होता त्यामुळेच आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

कसा घडला महाराष्ट्र ?

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x