29 March 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

आरपीआय बंद'मध्ये सहभागी न झाल्यानेच 'वंचित'चा बंद अपयशी : रामदास आठवले

VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, RPI, Union Minister Ramdas Athawale, Maharashtra band

मुंबई:  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात बंद ची हाक देण्यात आली होती. जालन्यातील मामा चौकात वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सीएए, एनआरसी विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मुख्य बाजार पेठ बंद करण्याच्या प्रयत्न केला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. बंद शांततेतच पार पाडायचा होता असे यावेळी आंबेडकर म्हणाले.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. अमरावतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. चेंबूर, सोलापूर येथे बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला बंद माझा पक्ष सहभागी न झाल्यानेच अपयशी झाल्याचा दावा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी असल्याचीही आठवण करुन दिली. ते मुंबईत बोलत होते. पुढे रामदास आठवले म्हणाले, “आजचा महाराष्ट्र बंद अनावश्यक होता. भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी होता. आजच्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ९९.९९ टक्के ठिकाणी बंद नाही, सर्व सुरु आहे. या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी नाही म्हणूनच प्रकाश आंबेडकरांचा बंद फेल ठरला.”

 

Web Title:  Vanchit Bahujan Aghadi Maharashtra Band failed because of RPI Absence claim Union Minister Ramdas Athawale.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x