16 December 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

विखेंमुळे नगरमध्ये भाजपाला काहीच फायदा झाला नाही, उलट तोटाच: राम शिंदे

Former Minister Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil

नगर: महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.

आमदार रोहित पवारांनी राज्याचे मंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले होते. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्यासाठी ही निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक आणि चर्चेची ठरली. भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्याने भाजपने विभागनिहाय बैठक सुरु केल्या होत्या आणि तेव्हा देखील नाशिक मधील बैठकीत राम शिंदे यांनी काँग्रेसमधील आयात नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लक्ष केलं होतं आणि पुन्हा त्याचीच आठवण त्यांनी करून दिली आहे.

शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आलेल्या अडचणींविषयी प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या ७ व्हायला हवी होती. परंतु प्रत्येक्षात ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे विखे फॅक्टर काहीही उपयोगी पडला नसल्याचे शिंदे म्हणाले. खुद्द शिंदे विधानसभेला पराभूत झाले आहेत.

‘अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी नाशिकमध्ये देखील केला होता.

 

Web Title:  Nager BJP loss Many Seats even Radhakrishna Vikhe Patil was in BJP says BJP Leader Ram Shinde.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x