15 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Kirit Somaiya Banners | ‘नवीन पॉर्नस्टार गिरगीट सोमय्या’.. राजकीय बॅनरबाजीतून महिलांसाठी जागोजागी सतर्कतेचा इशारा

Kirit Somaiya

Kirit Somaiya Banners | भाजपचे नेते तसेच माजी खासदार किरीट सोमय्या सध्या प्रचंड अडचणीत आहेत. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सोमय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमय्या यांच्या विरोधात काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. आजही या प्रकरणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद
या घटनेचे विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद उमटले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर अजितदादा गटानेही या प्रकरणी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणाची चौकशी कराच, पण किरीट सोमय्या यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीने केली आहे.

नको त्या अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन केल्यानंतर काँग्रेसने थेट बॅनर्स लावले आहेत. कल्याणमध्ये लावलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत. शिवसेनेने (ठाकरे) मुंबईसह राज्यातील विविध भागात जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आता काँग्रेसनेही सोमय्यांना घेरलं आहे.

काँग्रेसच्या वतीने सोमय्यांचे बॅनर्स
कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने सोमय्यांचे बॅनर्स लावण्यात आले. व्हिडीओतील एक दृश्य या बॅनरवर आहे. त्याचबरोबर रंग बदलणाऱ्या सरड्याचाही फोटो आहे. या बॅनरवर ‘बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देणारे भाजपचे लोकप्रिय नेते नवीन पॉर्न स्टार गिरगीट सोमय्या यांचा जाहीर निषेध’, असा मजकूर आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाठवले कपडे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईतील राष्ट्रवादी भवनातून पॅन्ट, शर्ट आणि अंर्तवस्त्र पाठवण्यात आली. “एक हाथ मदतीचा… आपल्या किरीट सोमयाला… भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा नग्न (NUDE) व्हिडीओ न्यूज चॅनेलवर दाखवण्यात येत आहे. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने कपडे विकत घेऊ शकत नाही, असे लक्षात येते. म्हणून मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमय्यांना पॅन्ट, शर्ट व अंतर्वस्त्र पाठवत आहोत. (अडचणीच्या वेळेत सर्वांनी पुढे येऊन सोमैयाजी ला कपडे देऊन मदत केली पाहिजे)”, अशा स्वरुपात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या प्रकरणावर टीका केलीये.

‘लंपट सोमय्या हाय हाय’
किरीट सोमय्या प्रकरणाचे पडसाद तिसऱ्या दिवशीही अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (युबीटी) आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणा बाजी केली. ‘किरीट सोमय्या हाय हाय’, ‘लंपट सोमय्या हाय हाय’, ‘कलंकित सोमय्या हाय हाय’, ‘किरीट सोमय्याला संरक्षण देणाऱ्या भाजपाचा निषेध असो’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

News Title : Kirit Somaiya Banners in Kalyan check details on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Kirit Somaiya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x