13 July 2020 6:05 AM
अँप डाउनलोड

मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे

MNS Rupali Patil, Raj Thackeray, Amruta Fadnavis

पुणे: अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे; आडनावाचा उच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्ष केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने सुद्धा सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आता शिवसेना आणि राष्ट्र्वादीने यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील माजी नगरसेवक रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील अमृता फडणवीस यांना लक्ष करत बोचरी टीका केली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रुपाली यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अमृता या डोक्यावर पडल्याचा खोचक टोला रुपाली यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. “वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत, बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेंचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे? मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानवर या,” असं रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच “काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सद्बुद्धि मागा लवकर देईल बाप्पा सद्बुद्धि,” असंही रुपाली या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

 

Web Title:  MNS Leader Rupali Patil slams Amruta Fadnavis over criticizing Thackeray surname.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(631)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x