दिशा सालियनच्या आई-वडिलांना माध्यमांना भेटण्यास बंदी, सुरक्षा वाढवली, टोकाचं पाऊल उचलल्यास शिंदे-फडणवीसांना भोवणार?

BIG BREAKING | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज सत्तांधाऱ्यांनी अनके प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिशा सालियनच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर आज विधानसभेत मुद्दा आला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांना प्रसारमाध्यमांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण, आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय असं सांगताना, जर हे थांबलं नाही तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू. यासाठी राजकारणीच जबाबदार असतील असं दिशाच्या आईनं यापूर्वीच प्रसार माध्यमांसमोर सांगितलं होतं.
आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय :
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन संपूर्ण माहिती दिली होती. दिशा सालियनच्या आत्महत्येवरुन सुरू असलेलं राजकारण थांबवावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली होती. यावेळी दिशाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. दिशावर आरोप करण्याचा आणि तिला बदनाम करण्याचा हक्क राजकारण्यांना कुणी दिला? आता ती आमच्यात नाही. पण राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी तिची बदनामी करुन आम्हाला त्रास देत आहेत. आम्हीही तणावात असून आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय आणि जर हे थांबलं नाही तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू. यासाठी राजकारणीच जबाबदार असतील असं दिशाच्या आईनं सांगितलं होतं.
दिशा प्रचंड आर्थिक तणावात होती – दिशाची आई
पुढे दिशांच्या आईने म्हटले होते की, ‘दिशानं कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचं तिच्या आईनं यावेळी स्पष्टच सांगितलं. दिशाच्या आत्महत्येवरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. पण त्यात काहीच तथ्य नाही. ती कामाच्या तणावात होती. तिची एक व्यावसायिक डील रद्द झाली होती आणि त्याच्या तणावात ती होती. पण त्यावेळी आम्ही तिचं म्हणणं इतकं मनावर घेतलं नाही. त्यानंतर तिच्या आणखी दोन मोठ्या डील रद्द झाल्या होत्या. याचाच तिच्यावर प्रचंड आर्थिक तणाव होता आणि तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. दिशा ती मनानं खूप हळवी होती. तिचा पोस्टमार्टम अहवाल देखील पोलिसांकडे आहे आणि तिनं आत्महत्या केल्याचं त्यातून समोर आलं आहे. तरीही आम्ही ज्यांना मतदान करतो तेच आमच्या मुलीची बदनामी करत आहेत हे पाहून खूप दु:ख होतं”, असं दिशाच्या आईनं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.
दिशाचा मृत्यू – सीबीआयचा निष्कर्ष
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला होता.
शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात आणि आगामी मुंबई महानगपालिका निवडणूका
त्यामुळे सध्या शिंदे गटाच्या खासदाराने संसदेत उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरले गेल्याने खळबळ माजवण्याच्या हेतूने हे आरोप केले गेल्याचं म्हटलं जातंय. मात्र यातून राजकीय दृष्ट्या शिंदे गट बावचळल्याचं म्हटलं जातंय. तसेच आगामी मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी हे प्रकरण तापवलं आणि लांबवलं जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mumbai police security hike at Disha Salian house after discussion in Maharashtra assembly check details on 22 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
Genesys International Share Price | मालामाल शेअर! 3 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, मागील एका महिन्यात 22 टक्के परतावा दिला
-
Mangal Shukra Yuti 2023 | 30 मे पासून मंगळ-शुक्र युती, या 5 राशींच्या लोकसांठी शुभं काळ, तुमची राशी कोणती?
-
Polychem Share Price | पॉलिकेम लिमिटेड शेअरने एका महिन्यात 36 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड कमाई, खरेदी करावा?
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा