18 September 2021 9:41 PM
अँप डाउनलोड

सावधान! मुंबईत पोहोचला कोरोना व्हायरस; २ संशयित रुग्णालयात

China corona virus

मुंबई: चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ १० दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाला गुरुवारी सुरुवात झाली. ३ फेब्रुवारीला हे अद्ययावत रुग्णालय सुरु होईल. आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोकांना याची बाधा झाली आहे. त्यामुळे चीनने युद्ध पातळीवर यावर काम सुरु केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झालेले दोन संशयित रुग्ण मुंबईत आढळले असून, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित रुग्ण नुकतेच चीनहून परतले आहेत अशी माहिची महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कोरोना विषाणुंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चीन मध्ये वाढत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष सुरु केला आहे. कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी हा वॉर्ड बनवण्यात आला आहे अशी माहिती महापालिकेच्या अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

संबंधित रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र सध्या त्यांना रुग्णांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण हे वसई नालासोपारा या भागातले आहेत. ते मागील १४ दिवसांत चीनमध्ये जाऊन आले होते. विमानतळावरच त्यांच्यातली लक्षणं दिसली. म्हणून त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 

Web Title:  China corona virus suspected patients found in Mumbai.

हॅशटॅग्स

#Mumbai(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x